| Feb 10, 2020, 7:22 PM (17 hours ago) | ![]() ![]() | ||
|
नांदेड (शंकर सिंह ठाकुर )नांदेड जिल्ह्यात रेती, माती ,मुरूम, तस्करी बरोबरच बेकायदेशीररित्या वृक्षतोड जोमात सुरू असून घटनेने अधिकारावर बसवलेले अनेक मोठे अधिकारी तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे पथके नावालाच असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे हे अधिकारी आपापले अधिकार कर्तव्याचा विसर पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी वाळू मुरुम चोरी मोठ्या प्रमाणात व तेजीत होत असताना दिसून येते
हदगाव तालुक्यात मध्ये तर वरिष्ठ अधिकारी हे शासनाचा महसूल बुडत असताना दिसत आहेत तर अधिक माहिती अशी की हादगाव तालुक्यात मनाठा हडसणी डोंगरगाव येथील वन जमिनीतील मुरूम माती उत्खनन व वृक्ष लाकूड तस्करी बेकायदा होत असल्याचे व्रत अनेक दैनिकातून प्रकाशित झाले होते तरीपण या वर्तपत्रा कडे दुर्लक्ष करून मिंदे पणाचा बुरखा घेतलेले हादगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून आज घडीला हे कानाडोळा करण्याचा प्रयत्न चालवित असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे हादगाव तालुक्यात आजही रेती मुरूम बेकायदा विक्री लाकूड पूर्ण गैरी वृक्ष कटाई हे बेकायदा धंदे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मध्यस्थामार्फत मॅनेज करून तसकर तालुक्यातील रावणगाव धोत्रा कोथळा बेलगवान गोरलेगाव बन चिंचोली वाटेगाव हस्तरा धानोरा बोरगाव गुरफळी बाबळी परिक्षेत्रातील पेन गंगा व कयाधु नदी पात्रातून रेती उपसा करणे व रात्री बाराच्या नंतर हादगाव शहरातुन चालू असलेल्या अनेक बांधकामावर टाकीत असून रेती मुरूम चोरी तस्करांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी मूक संमती दिली की काय ?असा जनतेतून प्रश्न वजा सूर निघत आहे हे महसूली अधिकारी यांनी आपले अधिकार कर्तव्य विसरून रेती पकडण्याचे टेंडर पोलीस विभागांना व मुरूम माती पकडण्याचा अधिकार वन विभागाला बाहाल केले की काय ? असे विविध प्रश्न तालुक्यात पाहण्यास मिळत आहेत
हादगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाची निष्क्रियता लाकूड तस्करी वरून वन अधिकारी यांची कर्तव्यदक्षता चव्हाट्यावर आलेले असतानाच येथील दोन जेसीबी सात टिप्पर हायवा यांच्या तपासावर जनता उलटसुलट प्रश्न उपस्थित करीत आहेत ते टिप्पर सोडवण्यासाठी कंपनीचा वाहनाचे मालक व महसूल विभागाचे अधिकारी आणि वनपरिक्षेत्र विभाग हादगाव यांच्यात तडजोड करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात हालचाली झाल्या त्या हादगाव परिसरातील जनतेत बोलल्या जात आसुन कायद्याने वनविभागाला अधिकार प्रदान केले असल्यामुळे संरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डी एस पवार नांदेड हे संबंधित हादगाव वनपरिक्षेत्रात घटनेने दिलेल्या अधिकाराचे कर्तव्य दक्षतेची कस लावून निपक्षपाती चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना व गुन्हेगारांना कायद्याने वठणीवर आणून आपली कर्तव्यदकतेची चुणूक अख्ख्या नांदेड जिल्ह्यातील जनतेला दाखवतील अशी खमंग चर्चा जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत
![]() | ReplyForward |