नांदेड जिल्ह्यात गुटखा जोमात अन्न व औषध प्रशासन कोमात नांदेड (मारुती शिकारे )नांदेड जिल्हा हा तेलंगणा व आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखा बंदी केलेली असून शेजारच्या राज्यात गुटखाबंदी नाही तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून निजामाबाद मार्गे नांदेड या ठिकाणी गुटखा पुरवला जातो नांदेड येथील मोठे मोठे गुटका माफिया आणि नांदेडच्या विविध भागांमध्ये मोठे मोठे गोडाऊन हे गुटका साठवण्यासाठी वापरत आहेत येथे यांचे मोठे मोठे डीलर आहेत गुटखा बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस आणि करायचे असते अन्न औषध वाले औषधी दुकानदार खाद्यपदार्थ पेय उत्पादक बडे व्यापारी यांच्याशी संधान साधून असतात दरमहा रतीब मिळण्याशी त्यांना मतलब असतो गुटखाच्या बाबतीत तर अन्न प्रशासन वाले सूस्त हातात तर पोलीस विभागात याबाबत कारवाई करताना दिसतो नांदेड जिल्ह्यात माळा विमल गोवा आदक पानकींग माणिकचंद वजीर व अनेक पद्धतीचे गुटके ग्राहकांना दुप्पट तिप्पट दराने विविध पान दुकानात व किराणा दुकानात सहज मिळतो तेलंगणा आंध्र प्रदेश मधून येणाऱ्या या गुटखाच्या गाड्या ह्या वेगवेगळ्या नावाच्या मालकाच्या पॅकिंगमध्ये येतात शिवाय लक्झरी मधूनही बुटका येतो एखाद्यावेळेस जर गुटखा पकडला गेला तर ड्रायव्हर किन्नर किंवा फंटरवर कारवाई होते मात्र या गुटख्याचा मुख्य सूत्रधार हा कधीच रेकॉर्डवर येत नाही पुढे सहित्या मुख्य सूत्रधारास रेकॉर्ड घेत नाही आर्थात सूत्रधार देवडा बडा तेवढाच त्यांच्या नामा निराळा राहाण्याची किंमत ही मोठी असते अवैध गुटख्याचे जे बडे डीलर आहेत त्यांची नावे पकडलेल्या आरोपी कडून वदविणे व रेकॉर्डवर आन्य हे कठीण नाही परंतु त्यांना पैशाच्या मोहापायी बाजूला सारले जाते
आता राज्य शासनाने नुकत्याच गुटखाबंदी बाबत अत्यंत कठोर धोरण अमलात आणण्याचे ठरविले आहे पण अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलिस हे कशाप्रकारे अंमलबजावणी करतात या बाबीकडे नांदेड वाशियांचे लक्ष लागले आहे