शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी नांदेड येथे दुसऱ्यांदा घडलेली घटना
नांदेड (सूर्यकांत तादलापुरकर) प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित प्रबोधन प्राथमिक विद्यालय म्हाळज मालटेकडी नांदेड येथे तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर अश्लील चित्रफीत दाखवून शाळेतील आरोपी शिक्षक स्वप्नील भीमराव शंगारे याने लैंगिक अत्याचार केला आहे शंकरनगर येथील घटना ताजी असतानाच लगेचच नांदेड मधील ही घटना घडणे म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ठरली आहे सदर चिमुकली ही प्रबोधन प्राथमिक विद्यालय म्हाळज माळ टेकडी येथे तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती सदरील मुलगी ही शाळेत आल्यानंतर तिला त्याच शाळेतील शिक्षक स्वप्नील भीमराव शृंगारे वय तीस वर्ष याने मुलीला मोबाईल मधील अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला सदर शिक्षक हा दारू पिऊन शाळेत राहत होता पण शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर वने यांनी सदर आरोपीची पाठराखण करत करत आहे त्याचे कारण असे की आरोपी शिक्षक हा संस्थाचालकांचा व मुख्याध्यापकाचा जवळचा नातेवाईक असल्यामुळे या आरोपीची मुख्याध्यापकांकडून पाठराखण केली जात आहे असे आमच्या लक्षात आले आहे आमच्या वर्तमानपत्र कडून या मुख्याध्यापकाची प्रतिक्रिया घेतली असता मुख्याध्यापक गंगाधर वने यांनी आसे म्हणाले की आरोपी स्वपनिल भिमराव शंगारे दारू पिऊन शाळेत कधीच आला नाही किंवा पीडित चिमुकलीने माझ्याकडे कधी तक्रार केली नाही माझ्याकडे शनिवारी पीडिताच्या आई-वडिलांनी तक्रार केली होती असे मुख्याध्यापक म्हणाले पण मुख्याध्यापकाने आपले नातेवाईक आहे काय कारवाई करायाची म्हणून मूग गिळून शांत बसले होते या मुख्याध्यापकाने आरोपी शिक्षक यांच्यावर सोमवार पर्यंत काहीच कारवाई केलेली नव्हती म्हणून पिडीत चिमुकलीच्या आई-वडिलांनी व म्हाळज मालटेकडी येथील नागरिकांनी सदर आरोपी शिक्षकास पोलिसाच्या हवाली आज रोजी केले सदर शिक्षक स्वप्नील भीमराव शंगारे यांच्यावर विमानतळ पोलीस ठाणे नांदेड येथे भा द वि 354 व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अश्लिल चित्रफित दाखवून शिक्षकाचा तिसरीतल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
• संपादक. पंडित वामराव हणमंते